‘मुठे’ चा ओढा होता काम नये
हिरवाईच्या जैववैविध्याच्या या ऱ्हासामुळे जागतिक तापमानवाढीच्या परिणामांना हातभार लागून उष्णतेच्या लाटा तसेच पूर व पाणी तुंबणे यासारख्या धोक्यांची तीव्रताही वाढणार आहे. एकंदरीतच पुणे मनपाची ही कृती म्हणजे पुण्याच्या नागरिकांचा विश्वासघात आहे.
अलीकडेच हजारो पुणेकरांनी वेताळ टेकडीवरील नियोजित रस्ते आणि योगद्यांचाही निषेध केला ज्यामुळे डोंगरातील पर्यावरणाचाही अपरिवर्तनीयपणे नाश होईल. हिरवळ आणि जैवविविधतेचे एकत्रित नुकसान हवामानातील बदल, उष्णतेच्या लाटा तीव्र होणे, पूर येणे आणि पाण्याची टंचाई निर्माण करणे, या सर्व गोष्टी पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहेत. ३१ मार्च २०२३ रोजी आमच्यापैकी काही जणांचा पर्यावरण क्षेत्रातील कामाबद्दल राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून पुणे मनपाने ‘पर्यावरण दूत’ अशी उपाधी देऊन सन्मान केला. पण मनपाच्या अनिर्बंध वृक्षतोडीबाबत आमच्यासह इतर अनेक नागरिकांनी हरकती घेऊनही त्यांची दखल घेतली जात नाही.
अधिक माहिती – link